Posts

तुम कौन हो

Image
यही सवाल मैं खुदसे पूछता रहता हूं ,  तुम कौन हो, जो मेरी जिन्दगी बदल गयी हो । मुझे हर चीज यूं तो हद में अच्छी लगती थीं ,  पर तुम कौन हो, जो मेरी आदत सी बन गयी हो । जो रहा करता था बेफिक्रो की तरह, करता था हमेशा बहाने, पर तुम कौन हो, जिसे देखकर खुद को लगा हूं संवारने । यूं तो मैं रहा करता था गुमसुम, न करता था किसिसे बाते, पर तुम कौन हो, जिससे अपने सुख दुःख लगा हूं बांटने । कल तक जो थी तुम किस्सा कहानियों का मेरी, पर तुम कौन हो जिसे बनाना चाहता हूं हिस्सा जिन्दगी का अपनी । चाहे लाख दफा हो जाऊ नाराज़ तुमसे, न जाने तुम कौन हो जिसका दामन थाम लेता हूं फिरसे । तुम ख़्वाब हो कोई या कोई हक़ीक़त हो, आख़िर तुम कौन हो जो मेरी हर कविता में बसती हो ।   - हुमेश कुरसुंगे

समुद्राची व्यथा

Image
समुद्राची व्यथा एरवी तू शांत असतोस आज एवढा खवळलेला का ? समजतयं उमजतयं तुझी ही ओढ किनाराला भेटण्याची... माझं ही हाल काहीस तुझ्यासारखचं आहे... फरक फक्त एवढंच की दुरूनही तू तिच्या जवळ आहे, तर मी जवळ असुनही खुप दूर.... करतोस स्वतःला तू लाटांद्वारे व्यक्त, पण तिला बघताच होतो मी मात्र गप्प... संगम, विरह हे तुझ्या सवयीचं, फक्त तिलाच बघता यावं हे कारण माझ्या विरंगुळ्याच... राग ही तेवढचं  प्रेम ही तेवढचं, कसं काय निभावतोस तू ही दोन्ही रूपे... खरंच जमेल का आम्हाला करायला अस प्रेम, जे समर्पणातून सुरू होउन समर्पणातच संपेल ? - हुमेश कुरसुंगे

फक्त तू

Image
फक्त तू शिशिरातल्या पानगळीतून वसंतात आलेली नवी पालवी तू, चातकाला ओढ ज्याची तो पाउस तू, सोनपहाटेच कोकिळगीत तू, अन् श्रावणामधला हिरवागार शालू ही तू ! सर्वांना हवेहवेसे वाटनारे स्वप्न तू, क्वचितच दिसनारी कस्तुरी मृग तू, अधीर झाली भूमी जिच्यासाठी ती पहिल्या पावसाची सर तू, अन् त्याच सरीतून चिंब भिजलेल्या मातीचे दरवळणारे सुगंध ही तू ! लाखो शिंपल्यातून एखादेच भेटणारे मोती तू, माझ्या कवितेच्या शब्दा शब्दात तू, आणि हो सदैव असतो मी जिच्या शोधात ती हरवलेली वाट ही तू !! - हुमेश कुरसुंगे

माझी आई

Image
माझी आई तुझ्याविना गं आई,  जीवन हे काहीच नाही, तू नसताना जवळ जगण्याला, माझ्या अर्थच नाही. आई माझी आई... शिकवले चालायला मला, बोलायला ही तूच शिकवले, ठेच लागता कधी गं, तुझेच नाव ओठी येई. आई माझी आई... होतो जेव्हा मी बाळ तान्हा, भरविले तू मला पाजूनी पान्हा, झोप न लागता कधी गं, निजविले मला तू गाऊनी अंगाई. आई माझी आई... देवाकडे गं तुझे एकचं मागणे, सुखी ठेव लेकराला हेची सांगणे, भरविला तू घास मला गं, स्वतः राहुनी उपाशी. आई माझी आई... लागली मला ओढ घराची, वाट पाहे जसे चातक पावसाची, गुंतले हे जीव माझे गं, फक्त तुझ्याचं पायी. आई माझी आई... -  हुमेश कुरसुंगे
Image
न मस्कार,                मी हुमेश्चंद्र चंद्रशेखर कुरसुंगे आपले सहर्ष स्वागत करीत आहे.  या   ब्लॉगच्या माध्यमातून माझे स्वलिखित लेख, कविता, चारोळ्या तुमच्यासोबत सामायिक करीत आहे. हे माझे पहिले वहिले ब्लॉग आहे काही चुक झाल्यास पदरात घ्या. आशा आहे की येथील माहिती आपणास उपयोगी पडेल. मी सदैव आपल्यासाठी उपयुक्त अशी माहिती पुरविण्याचा यथोचित प्रयत्न करेन. तसेच आपणाकडेहि काही माहीती अगर सुचना असतील तर नक्की कळवा.  ध न्यवाद.