माझी आई

माझी आई

तुझ्याविना गं आई, 
जीवन हे काहीच नाही,
तू नसताना जवळ जगण्याला,
माझ्या अर्थच नाही.
आई माझी आई...

शिकवले चालायला मला,
बोलायला ही तूच शिकवले,
ठेच लागता कधी गं,
तुझेच नाव ओठी येई.
आई माझी आई...

होतो जेव्हा मी बाळ तान्हा,
भरविले तू मला पाजूनी पान्हा,
झोप न लागता कधी गं,
निजविले मला तू गाऊनी अंगाई.
आई माझी आई...

देवाकडे गं तुझे एकचं मागणे,
सुखी ठेव लेकराला हेची सांगणे,
भरविला तू घास मला गं,
स्वतः राहुनी उपाशी.
आई माझी आई...

लागली मला ओढ घराची,
वाट पाहे जसे चातक पावसाची,
गुंतले हे जीव माझे गं,
फक्त तुझ्याचं पायी.
आई माझी आई...


हुमेश कुरसुंगे

Comments