फक्त तू

फक्त तू

शिशिरातल्या पानगळीतून
वसंतात आलेली नवी पालवी तू,
चातकाला ओढ ज्याची तो पाउस तू,
सोनपहाटेच कोकिळगीत तू,
अन् श्रावणामधला हिरवागार शालू ही तू !

सर्वांना हवेहवेसे वाटनारे स्वप्न तू,
क्वचितच दिसनारी कस्तुरी मृग तू,
अधीर झाली भूमी जिच्यासाठी ती
पहिल्या पावसाची सर तू,
अन् त्याच सरीतून चिंब भिजलेल्या मातीचे दरवळणारे सुगंध ही तू !

लाखो शिंपल्यातून एखादेच भेटणारे मोती तू,
माझ्या कवितेच्या शब्दा शब्दात तू,
आणि हो सदैव असतो मी जिच्या शोधात ती हरवलेली वाट ही तू !!

- हुमेश कुरसुंगे

Comments

Popular posts from this blog

तुम कौन हो

माझी आई