फक्त तू

फक्त तू शिशिरातल्या पानगळीतून वसंतात आलेली नवी पालवी तू, चातकाला ओढ ज्याची तो पाउस तू, सोनपहाटेच कोकिळगीत तू, अन् श्रावणामधला हिरवागार शालू ही तू ! सर्वांना हवेहवेसे वाटनारे स्वप्न तू, क्वचितच दिसनारी कस्तुरी मृग तू, अधीर झाली भूमी जिच्यासाठी ती पहिल्या पावसाची सर तू, अन् त्याच सरीतून चिंब भिजलेल्या मातीचे दरवळणारे सुगंध ही तू ! लाखो शिंपल्यातून एखादेच भेटणारे मोती तू, माझ्या कवितेच्या शब्दा शब्दात तू, आणि हो सदैव असतो मी जिच्या शोधात ती हरवलेली वाट ही तू !! - हुमेश कुरसुंगे