समुद्राची व्यथा

समुद्राची व्यथा एरवी तू शांत असतोस आज एवढा खवळलेला का ? समजतयं उमजतयं तुझी ही ओढ किनाराला भेटण्याची... माझं ही हाल काहीस तुझ्यासारखचं आहे... फरक फक्त एवढंच की दुरूनही तू तिच्या जवळ आहे, तर मी जवळ असुनही खुप दूर.... करतोस स्वतःला तू लाटांद्वारे व्यक्त, पण तिला बघताच होतो मी मात्र गप्प... संगम, विरह हे तुझ्या सवयीचं, फक्त तिलाच बघता यावं हे कारण माझ्या विरंगुळ्याच... राग ही तेवढचं प्रेम ही तेवढचं, कसं काय निभावतोस तू ही दोन्ही रूपे... खरंच जमेल का आम्हाला करायला अस प्रेम, जे समर्पणातून सुरू होउन समर्पणातच संपेल ? - हुमेश कुरसुंगे